Site Logo
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड शहरामध्ये माळुंगे शिंदे वासुली, खालुंब्रे येथे अवैधरित्या गॅस भरणा केंद्राचा सुळसुळाट…….

प्रतिनिधी माळुंगे

पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये पासून अवैध गॅस भरणा केंद्राचा सुळसुळाट झाला आहे. घरगुती वापराचे तसेच व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर घेऊन एका मशीनच्या सहाय्याने इतर गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरला जात आहे. या गॅस सिलेंडरचा वापर वाहनांमध्ये केला जात आहे. या अवैध व्यवसायामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एखाद्या वेळी एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस भरताना निष्काळजीपणा झाल्यास मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. खुले आम मार्केट मध्ये पिंपरी चिंचवड शहरात माळुंगे येथे शिंदे वासुली, खालुम्ब्रे lगावात काही ठिकाणी अशा प्रकारचे गॅस भरणा केंद्रच सुरू झाले आहे.

या संदर्भा माहिती मिळली.तहसीलदार, मालमत्ता गुन्हे शाखा, माळुंगे पोलीस स्टेशन यांनी कारवाई करण्यात टाळाटाळ करतात. यांच्या हप्ते चालू असल्यामुळे या परिसरात दुर्लक्ष केले जात आहे उद्या काही मोठा अपघात घडला मार्केटमध्ये तर जबाबदार कोण असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक महिला करीत आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेने केली आहे.जनतेने सांगितले अनेक महिन्यापासून इथे अवैध गॅस वरणा केंद्र चालू आहे. कारवाई करण्याच्या नावावर दुर्लक्ष होत आहे. प्रशासन कारवाई करणार का?

;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button