Site Logo
गुन्हेगारीमहाराष्ट्र

*डॉ. नीलभ रोहन यांनी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून प्रथमता संधी !

(हिंगोली जिल्हा ) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.

 

हिंगोली:– महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागांने सध्या पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरू केला असून यामध्ये सोमवारी रात्री उशिरा दोन आयपीएस एका डीवाय एसपी अधिकाऱ्याचा समावेश होता. यामध्ये डॉ .नीलभ रोहन आणि सौरभ कुमार अग्रवाल यांच्या बदल्याचे आदेश धडकले होते. डॉ. नीलभ रोहन हे यापुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवाद विरोधी पथकांचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते तेथेही त्यांनी नुकताच पदभार घेतला होता. त्यानंतर त्यांची हिंगोलीत बदली झाली आहे पोलीस अधीक्षक या पदावर त्यांची पहिल्यांदाच नियुक्ती असल्याची माहिती समोर आहे. आज रोजी दुपारी 2 वाजता हिंगोली पोलीस मुख्यालयात डॉ. नीलभ रोहन यांनी मावळते पोलीस अधीक्षक डॉ .श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकृष्ण कोकाटे हे आत्तापर्यंत हिंगोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून होते. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकृष्ण कोकाटे यांनीही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले, मात्र पुढील नवीन पदस्थापना मिळेपर्यंत राज्य गृह विभागाकडूंन डॉ. श्रीकृष्ण कोकाटे यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. तर नव्याने पदभार स्वीकारलेले आयपीएस अधिकारी डॉ . नीलभ रोहन यांना हिंगोली जिल्ह्यात एसपी म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या एसपी कडूंन कायदा व सुव्यवस्था अंबधित राखणे,गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे या दिशेने त्यांचे कार्य नक्कीच उल्लेखनीय ठरेल अशी अपेक्षा आता हिंगोलीकरांकडून व्यक्त होत आहे. डॉ .नीलभ रोहन हे एक कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय मनमिळावू आणि जनतेशी संवाद साधणारे अधिकारी म्हणून ओळखले जाते. हिंगोली जिल्ह्यात प्रथमता त्यांना पोलीस अधीक्षक म्हणून संधी मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button