पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकारण
भारतीय जनता पार्टी चे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच मातंग समाजा चे नेते मारुती गणपत जाधव यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश..
राष्ट्रवादीचा प्रभाग ११ मध्ये मास्टरस्ट्रोक आमदार समर्थक मारुती गणपत जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

पिंपरी :-सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांचा फुलेनगर, घरकुल आणि शरदनगर परिसरात मोठा मित्रपरिवार तसेच निस्वार्थ सेवेतून सामाजिक कार्यातून निर्माण झालेली त्यांची ओळख आणि घरकुल मधील स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांना प्रभागातील नागरिक प्रथम प्राधान्य देतील त्यामुळे पॅनलची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
एकंदरीतच प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि जनसंपर्क असलेला पॅनल उभा केल्याने आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




