Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

April 16, 2026

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नि:पक्षपातीपणे कामकाज करा – आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर*
पिंपरी चिंचवड

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नि:पक्षपातीपणे कामकाज करा – आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर*

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comDecember 16, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

 

पिंपरी, दि. १६ डिसेंबर २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर उत्तम समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसार अत्यंत जबाबदारीने पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, अशा सूचना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आढावा बैठक आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,त्यावेळी ते बोलत होते.

या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप जिल्हाधिकारी अनिल पवार, अर्चना पठारे, पल्लवी घाटगे, किरणकुमार काकडे, सुरेखा माने, हिम्मत खराडे, सुप्रिया डांगे, दीप्ती सूर्यवंशी, हनुमंत पाटील, सह आयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त सचिन पवार, संदीप खोत, अतुल पाटील, डॉ. चेतना केरुरे, व्यंकटेश दुर्वास, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरण राज यादव, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे, निवेदिता घार्गे, तानाजी नरळे, राजाराम सरगर, अश्विनी गायकवाड, नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, गौरी तेलंग, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर, दिलीप भोसले, वैशाली ननावरे, चंद्रकात मुठाळ, सुनील शिंदे, शिवाजी चौरे, विजय सोनवणे, हेमंत देसाई, सतीश वाघमारे, सोहम निकम, सुर्यकांत मोहिते, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, प्रत्येक प्रभागातून ४ उमेदवार निवडून द्यायचे असून, प्रत्येक मतदाराला ४ उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. याच पद्धतीने ईव्हीएमची रचना आणि इतर तांत्रिक बाबींचे नियोजन असणार आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सर्वांसाठी अत्यंत संवेदनशील असणार असून शहरात सुमारे १७ लाख मतदार असून त्यांच्या नियोजनासाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये निश्चित करण्यात आली आहेत. कामात सुसूत्रता आणण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर योग्य मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मतदारांच्या सोयीसाठी नव्याने काही मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रभागातील मतदान केंद्र त्याच प्रभागात राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांशी समन्वय साधून गर्दीचे नियोजन व कायदा-सुव्यवस्था राखली जावी. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रांवर योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणे, संवेदनशील व आदर्श मतदान केंद्रे निश्चित करणे आणि मतदान साहित्याची गुणवत्ता तपासणे या बाबींकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. मतमोजणीसाठी जागा अपुरी पडत असल्यास शाळा, कॉलेज किंवा मंगल कार्यालयांची पाहणी करून त्या ठिकाणी मतदान केंद्रे स्थलांतरित करण्याची सोय करावी, अशा सूचना आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी दिल्या.

याशिवाय, मतदार याद्यांबाबत आलेल्या सुमारे १ लाख तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, चुकीच्या प्रभागात नावे असल्याच्या तक्रारी दूर करण्यात आल्या आहेत. दुबार मतदारांची पडताळणी प्रभाग स्तरावर सुरू असून हे काम २७ तारखेपर्यंत पूर्ण करून त्याच दिवशी मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही निवडणूक प्रक्रिया संवेदनशील असल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून आपल्या स्तरावर निवडणूकीचे सूक्ष्म नियोजन करावे. कोणतीही अडचण आल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सर्व कामकाज प्रामाणिकपणे व जबाबदारीने पूर्ण करावे, असे निर्देश देखील आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी दिले.

बैठकीत निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिका निवडणूक कार्यक्रमाची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे देण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रेसर – आमदार शंकर जगताप*
Next Article अवैध धंदे गुन्हेगार तस्करी करणारे नियम न पाळणाऱ्यांनो सावधान:- नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पदभार घेताच दिला इशारा !
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

April 16, 2026

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

By newsexpress18pune@gmail.comApril 16, 20260

ग्रामीण व आदिवासी नागरिकांना मोफत तपासणी, औषध वितरण व आरोग्य जनजागृतीचा लाभ **दिवळे (भोर) प्रतिनिधी:**…

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.