सांगली शहरांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज अनुभवायला मिळाला:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
(सांगली जिल्हा) प्रतिनिधी.

सांगलीत आज रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्वल्य लोककल्याणकारी आणि प्रेरणादायी कार्याची आठवण जपणारा भव्य अश्वासढ पुतळा सांगली शहरात उभारण्यात आला असून. या पुतळ्याचे लोकार्पण आज रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी. फडवणीस यांच्याहस्ते पार पडले, यावेळी महाराष्ट्रांचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी. फडवणीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. सांगली करांच्या भावनांचा आधार ठेवत जिल्हा नियोजन निधीतून उभारण्यात आलेला हा पुतळा नव्या पिढीला इतिहासातून प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. हा सोहळा सांगलीकरांसाठी ऐतिहासिक ठरला. या लोकार्पण कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय कारभाराची, समाजसुधारणेची आणि लोकहितांच्या कार्याची परंपरा जपणारा हा पुतळा सांगली शहरांच्या वैभवात भर घालणारा ठरेल अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अशोक काकडे महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे खासदार विशाल पाटील माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह विविध मान्यवर लोकप्रतिनिधी आणि पुतळा समितीचे पदाधिकारी तसेच सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री यांच्या सांगली दौऱ्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.*




