Site Logo
गुन्हेगारीपुणेमहाराष्ट्र

पुणे जिल्यातील गुन्ह्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन अपहरण झालेल्या मुलीचा राहुरी पोलिसांकडून शोध*

ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत राहुरी पोलिसांकडून तब्बल 107 मुलींचा शोध घेऊन दिले पालकांच्या ताब्यात

पुणे :-यवत तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलगी वय 17 वर्ष ही दि.14/02/2025 रोजी सायंकाळी 10:00 वाजेच्या सुमारास राहते घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत मुलीच्या पालकांनी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 162/2025 BNS 137(2) प्रमाणे दाखल केला होता सदर मुलगी ही राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत असले बाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे ह्यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती भेटल्याने त्यांनी सदर माहिती माननीय राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांना कळवल्याने राहुरी पोलीस स्टेशन कडील संजय ठेगे साहेब यांनी सदरची माहिती ही यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना वरील सदर घटनेची माहिती कळवल्याने यवत पोलीस स्टेशन कडील तपाशी अधिकारी यांना सदर मुलीची माहिती देऊन त्यांना राहुरी पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 21/03/2026 रोजी मुलीचा शोध घेऊन ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात पो. कॉ. प्रमोद ढाकणे, , सचिन ताजने , अंकुश भोसले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button