Site Logo
गुन्हेगारीपुणेमहाराष्ट्र

वाढदिवस साजरा करायचा म्हणून प्रवाशांकडे खंडणी आरोपींच्या बंडगार्डन पोलिसांनी आवळल्या मुसक्या ! बंडगार्डन पोलिसांची कामगिरी,

संभाजी पुरीगोसावी ( पुणे शहर ) प्रतिनिधी.

पुणे :- बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने संशयित आरोपींनी थेट प्रवाशाकडुन खंडणी उकाळणा-या संशयित आरोपींना अखेर बंडगार्डन पोलिसांनी अगदी शिताफीने तपासाची गती वाढवून बेड्या ठोकल्या बेड्या आहेत. फिर्यादी नामे धनिष कुमार हेरंद्र प्रसाद (वय २२) व्यवसाय सेंट्रींग काम, रा बांलगंधर्व चौक, कुलकर्णी यांचे बांधकाम साईट, डेक्कन, पुणे मुळ रा ग्राम जहाँगिरपुर, पोस्ट सुमई शाहपुर, थाना बनीयापुर, जिल्हा छपरा सारंग, बिहार यांचा मित्र नामे सत्येंद्र महतो (वय 41) रा शंकरपुर टोला, चकीया, सिवान, बिहार यांना रिक्षामधील चार अनोळखी इसमांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देवुन त्याची पत्नी हीचेकडुन ऑनलाईन २५,०००/- रु मागवुन घेतल्याने रिक्षामधील चार अनोळखी इसमाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ४०/२०२६ भा. न्याय संहिता कलम ३०८ (५).३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्हा लवकरात लवकर उघडकिस आणण्याचे दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी आपल्या पोलीस ठाणेकडील तपासी पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सुचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने तपास अधिकारी व अंमलदार दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना तांत्रीक तपास व सीसीटीव्ही फुटेजव्दारे संशयितांचा गुलटेकडी परीसरांत शोध घेत असताना संशयित इसम नामे. गणेश आण्णा जगधने (वय २९ ) रा. डायसप्लॉट कॅनॉल, गुलटेकडी, पुणे २. अमोल उत्तम गायकवाड (32वय ) रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे यांना दिनांक २५/०२/२०२६ रोजी ताब्यात घेवुन कसुन चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. असुन आरोपीतांना दिनांक २५/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली. तपासा दरम्यान त्यांचे गुन्हयातील सहकारी यांचेबाबत माहिती दिल्याने इसम नामे. अतुल रविंद्र गायकवाड (वय 38) रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे. संतोष राधाकिशन सरोदे (वय 31) रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे यांना दि. २७/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आलेली असुन मा. न्यायालयाने सर्व आरोपींना 2 मार्च रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दाखल गुन्हयाचे तपासा मध्ये आरोपींकडून गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा व गुन्हयातील खंडणी स्वरुपात घेतले रक्कमेपैकी 10,000/- रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी अमितेशकुमार पोलीस आयुक्त सो. पुणे शहर रंजनकुमार शर्मा. सो. पोलीस सह. आयुक्त, मा. मनोज पाटील सो. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे. श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -5 श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे सो.सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पो.अं. प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button