Site Logo
महाराष्ट्रगुन्हेगारी

पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, शर्मिष्ठा घारगे-वालावलकर कणखर क्षेत्रातील संवेदनशील महिला पोलीस अधिकारी!

संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

 

सातारा:-महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात आणि विविध जिल्ह्यांमध्ये विविध पदावर नेहमीच प्रयत्नशील राहणाऱ्या कणखर क्षेत्रातील संवेदनशील महिला पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, अनेक महत्त्वाच्या केस सोडवल्या आहेत. एक धडाडीच्या महिला अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. मूळच्या सांगलीच्या वडील महापालिकेत अधिकारी होते. आई गृहिणी आणि आठ भाऊ अशा या कुटुंबातील शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आहेत. पोलीस खात्याबद्दल त्यांना लहानपणापासूनच आकर्षण होतं. आव्हानात्मक काम करायला आपल्याला आवडतं, असा त्यांचा नेहमीच कयास होता. कुटुंब सांभाळून पोलीस दलात काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. पोलीस विभाग पुरुषप्रधान आहे. जर गुणवत्ता असेल तर संधी मिळत जातात. महिलांमध्ये अधिक काम करण्याची तयारी असते. क्राईम ब्रँच मध्येही असताना अनेक आव्हानात्मक कामे करावी लागली ती कामे संधी समजून करीत गेले, त्यात यश आले परिणामी अडचणीवर मात करता आली. शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी आपल्या पोलीस सेवेमध्ये आजपर्यंत नागपूर नाशिक सोलापूर कोल्हापूर अशा ठिकाणी विविध पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्यात मागीलच महिन्यांत एका निनावी पत्रावरून नामांकित शिक्षण संस्थेतील 22 मुलींवर लैंगिक अत्याचारांचे प्रकरण उघडकीस आणत संवेदनशीलपणे त्यांनी तपास करून आरोपींना तब्बल चार वेळेस जन्मठेपेची शिक्षा लागेपर्यंत पाठपुरवठा केला आणि यामध्ये 22 मुलींना त्यांनी न्याय मिळवून दिला या त्यांच्या कामगिरीबद्दल देखील केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथकांने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अशा त्यांच्या पोलीस खात्यातील सेवेला मानाचा सलाम, त्याच अनुषंगाने आदरणीय शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम जी.ना. वाढदिवसांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button