
पिंपरी :-शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वाहनांची पिंपरी चिंचवडमध्ये तपासणी करण्यात आली आहे. रोहित पवार हे आज (दि.२५) बैठकीसाठी शहरात येत आहेत.
मुंबई वरुन रोहित पवार हे हेलिकॉप्टरने पिंपरी चिंचवडच्या एका कंपनीतील हेलिपॅडवर येणार आहेत. त्याठिकाणी रोहित पवार यांना घेण्यासाठी आलेल्या वाहनांची पोलिसांनी तपासणी केली आहे. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरु आहे, वाहनांची तपासणी हा त्याचाच एक भाग आहे.
मात्र सत्ताधाऱ्यांच्या बॅग तपासल्या जात नाहीत, आमच्या रिकाम्या गाड्या तपासल्या जातात अशी टीका रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टवर करण्यात आली आहे.”





