प्रजासत्ताक दिनानिमित्त वसंतराव काळे पब्लिक स्कुल येथे ध्वजारोहण उत्साहात संपन्न!
प्रतिनिधी इंदापूर

आज दिनांक 26जानेवारी सोमवार रोजी वसंतराव काळे पब्लिक स्कुल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण विश्वास नरवाडे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.मुलांच्या शैक्षणिक प्रगती बरोबर क्रिडा क्षेत्रात पारंगत असावित हा मानस ठेवुन वार्षिक क्रिडा उत्सव शाळेत आयोजित करण्यात आल्या होता यावेळी बक्षिस वितरण करण्यात आल.
*बक्षिस वितरण सोहळ्यासाठी ॲडव्होकेट विष्णुपंत सोळुंके सर व कलवरी चित्रपटातील अभिनेता इंजि.राहुल दराडे उपस्थित होते ,* मान्यवरांच्या हस्ते विविध क्रिडा स्पर्धेचे बक्षिस वितरण पार पडले तसेच स्पर्धा परिक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, मेडलसह सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शकन करताना अभिनेता राहुल दराडे यांनी यांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणा बरोबरच ,कला ,क्रिडा व नृत्य असा आवडीच्या क्षेत्रात मनापासून पयत्न करावेत असे आव्हान केले तर सोळंके सरांनी शाळेत चालत असणारे विविध उपक्रम ,सर्व शिक्षक वर्ग घेत असणारी मेहनत व संस्थेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे सर यांचे असणारे वैयक्तिक लक्ष याचे कौतुक केले शाळेत शिकत असताना अगोदर शिकवलं जात मग पराक्षा घेतली जाते तर जिवणात यशस्वी होण्यासाठी अगोदर परिक्षा द्यावी लागते असे सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वेल्था सरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या .

संस्थेचे सचिव डॉ नरेंद्र काळे सर यांनी अल्पफीस मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा व इंग्रजी माध्यधमाचे शिक्षण सर्व मध्यमवर्गीय पालकांना आपल्या पाल्यांना शिक्षण देता याव हे आमचे ध्येय आहे असे सांगितले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्योती मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सांस्कृतीक विभाग प्रमुख यांनी केले ,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रिडाशिक्षक गोरक्ष जाधव सर यांनी विशेष प्रयत्ऩ केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ महेंद्रकुमार जाधव सर,सचिव डॉ. नरेंद्र काळे सर ,मुख्याध्यापक वेल्था सर ,प्रिती मॅडम शाळेचे पर्यवेक्षक केदार सर विद्यार्थी , शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.





