लातूरमध्ये,पतीने दुसऱ्या महिलेसोबत बोलतानाचे चॅटींग पत्नीने पाहिले, अन् संतापलेल्या आरतीने आपलं जीवन संपविले!
संभाजी पुरीगोसावी (लातूर जिल्हा) प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये वरवंती गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये एका पत्नीला आपल्याच पतीचे दुसऱ्या महिलेसोबत मोबाईल फोनवर बोलताना चे चॅटिंग सापडले आहे. आणि ते चॅटिंग पाहून विवाहित महिलेने दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यातील वरवंती गावात घडली आहे. सौ. आरती रामेश्वर उरगंडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ती आपला पती रामेश्वर सिद्धेश्वर उरगंडे सासरे सिद्धेश्वर उरगंडे यांनीही या प्रकरणात त्यांचा मुलगा रामेश्वरला पाठिंबा दिला होता. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाणेचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाणेत झाली असून पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.



