जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे नववर्षानिमित्ताने रंगला काव्य मैफिलीचा जागर..
पुणे( प्रतिनिधी )राहुल कडलाक

नविन वर्षाची सुरवात काव्यरूपी व्हावी व कवींना प्रेरणा व नवचैतन्य मिळावं म्हणून खरमा साहित्य संघ व कला साहित्य विचार मंच आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्याच दिवशी कला साहित्य यांची खास मेजवानी देण्यासाठी भव्य कवी संमेलनाचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते खं र माळवे होते. तसेच उदघाटक म्हणून प्रसिद्ध उद्योजक आप्पा वाव्हळ, आळे गावचे सरपंच सखाराम भंडलकर माजी सरपंच विजय कुऱ्हाडे RPI नेते संभाजी साळवे पोपट राक्षे कृ, उ, बा, स जुन्नर संचालिका प्रियांका शेळके,कलावंत संघटनेचे अध्यक्ष गवनेर सरोदे,सरपंच महेश शेळके,शंकर गोफणे, समाजसेवक राजेंद्र आल्हाट, विनोद आश्टूळ सम्राट साहित्य मंच पुणे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम कवी डॉ. संजय बोरुडे यांनी “तर खरंच सांगत होतो ज्योतिबा “या कवितेचं या कवितेने रसिकांचा चित्त वेधून घेतलं.कवी सुभाष सोनवणे महाराष्ट्रातील अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले; ज्यांनी अभंगाच्या अमृतवाणीने रसिकांना भुरळ पाडून गेली. सम्राट साहित्य मंच पुणे यांचे प्रमुख यांनी देखील आपल्या धारदार शैलीत प्रहार केला.
कविता सादरीकरणात संतोष गाढवे,नवनाथ सरोदे, दत्ता सुकाळे,शब्दस्वरा मंगळूरकर अशोक उघडे, अलका जोगदंड, बाळासाहेब ताजवे, संदिप ताजवे, जदेव्रत आखाडे, रुपचंद शिदोरे, प्रा साळवे, शाहिर शिवाजी थिटे, गोकुळ गायकवाड,नितिन शेलार,, शांताराम देठे,अल्पेश सोनवणे, तसेच संजना आभाळे, सरिता शिंदे, प्रियंका घुंबरे, समिक्षा दिघे इ नव कवयित्रींनी देखिल काव्य रचना सादर केल्या .
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी लागली त्यात पत्रकार सुदर्शन मंडले,मा पोलिस पाटील बाळासाहेब कदम, रि प चे सुरेश खरात व सोमनाथ शिंदे,बन्सी त्रिभुवन,सनई वादक किसन खरात,गौतम शिंदे, भारतीय बौद्ध महासभेचे अरविंद पंडित,पो.नि . रामचंद्र कुटे, दत्ताराम कुटे, मोलाचे सहकार्य लक्ष्य पोलिस भरतीआळेफाटा प्रशिक्षणचे प्रमुख निलेश रायकर सर, शिवनेरी न्युज संपादक राहुल कडलाक उद्योजक,अनिल भुजबळ, उद्योजक सिद्धार्थ वाव्हळ,संदिप शितोळे आदींचे सहकार्य लाभले . प्रास्तविक संपादक पोपट सोनवणे यांनी ;सुत्रसंचलन कवि संतोष गाढवे व विनोद अष्टुळ यांनी तर आभार अध्यक्ष डॉ खर माळवे यांनी मानले .



