यवतमाळ जिल्हयातून तडीपार केलेले दोन इसम पोलीस स्टेशन उमरखेड हददीत मिळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई.
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, पाहीजे आरोपी शोध, तडीपार इसम, अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 10/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पाहीजे आरोपी शोध, अउघड गुन्हे समांतर तपास करीत असतांना 12/00 वाजण्याचे सुमारांस ।) मा. उपविभागीय अधिकारी सा उमरखेड यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक तडीपार प्र.क्र./03/मपोका कलम 56 (अ), (ब) मौजा विडूळ ता. उमरखेड दिनांक 02/04/2025 अन्वये 01 वर्षा करीता यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम जिल्हा तडीपार असलेला इसम नामे रितेश महेंद्र तिवारी रा. विडूळ ता. उमरखेड जि.यवतमाळ हा विडूळ परिसरात राहत असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद आदेशांची पडताळणी करुन तडीपार इसमांबाबत माहीती काढून त्यास विडूळ ते ढाणकी रोड विरु धाबा हरदडा परिसर येथून ताब्यात घेवून त्यास मा. उपविभागीय अधिकारी सा उमरखेड यांनी पारित केलेल्या आदेशांचे उल्लघंन केले.
त्यानंतर दिनांक 10/02/2026 रोजी रात्री 22/30 वाजण्याचे सुमारांस 1) मा. उपविभागीय अधिकारी सा उमरखेड यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक तडीपार प्र.क्र./05/मपोका कलम 56 (अ), (ब) मौजा नागापूर रुपाळा ता. उमरखेड दिनांक 02/04/2025 अन्वये 01 वर्षा करीता यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम जिल्हा तडीपार असलेला इसम नामे- शेख गौस शेख करीम वय 22 वर्ष, रा. नागापूर रुपाळा ता.उमरखेड जि. यवतमाळ हा उमरखेड ते ढाणकी रोड हायवे ब्रिज परिसरात असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद आदेशांची पडताळणी केली करुन तडीपार इसमांबाबत माहीती काढून त्यास उमरखेड ते ढाणकी रोड हायवे ब्रिज परिसर येथून ताब्यात घेवून त्यास मा. उपविभागीय अधिकारी सा उमरखेड यांनी पारित केलेल्या आदेशांचे उल्लघंन केले असल्याने दोन्ही तडीपार इसम नामे 1) इसम नामे रितेश महेंद्र तिवारी वय 24 वर्ष, रा.विडूळ ता.उमरखेड जि. यवतमाळ 2) इसम नामे- शेख गौस शेख करीम वय 22 वर्ष, रा. नागापूर रुपाळा ता. उमरखेड जि. यवतमाळ यांचे विरुध्द कलम 223 भान्यास सह कलम 142 मपोका अन्वये उमरखेड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ
(सतीश चवरे) पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ



