प्रतिनिधी- परमेश्वर कांबळे
**म्हाळुंगे (पुणे):–पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैध हातभट्ट्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, **दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज) आणि एम.आय.डी.सी. विभाग** यांनी ११ जून २०२६ रोजी एक संयुक्त आणि मोठी कारवाई केली. यामध्ये हद्दीतील सराईत आरोपींची अनधिकृत दारू विक्रीची ठिकाणे जेसीबीच्या साहाय्याने नेस्तनाबूत करण्यात आली.
### **एम.आय.डी.सी. च्या मदतीने अनधिकृत बांधकामे पाडली**

दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांच्या कारवाईदरम्यान असे निदर्शनास आले की, सराईत दारू विक्रेत्यांनी ही विक्रीची ठिकाणे अनधिकृतपणे बांधली होती. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तातडीने एम.आय.डी.सी. विभागाशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने संयुक्त मोहीम आखून थेट जेसीबीच्या मदतीने ही बांधकामे कायमची नष्ट केली.
### **कारवाई झालेल्या आरोपींची व ठिकाणांची नावे:**
१. **दुरेश रमेश राठोड** – सिग्मा चौक, महाळुंगे (ता. खेड, जि. पुणे)
२. **लखन जडजा शिंदे** – सिग्मा चौक, महाळुंगे (ता. खेड, जि. पुणे)
३. **पुष्पादेवी शांतीलाल जाट** – हिंदुस्थान पेट्रोल पंप, तळवडे ब्रिज, निघोजे (ता. खेड, जि. पुणे)
४. **लखन हाजुरीया ठाकुर** – डी. के. चौक, कुरुळी (ता. खेड, जि. पुणे)
५. **उदय अशोक कलाल** – एच. पी. पेट्रोल पंपाजवळ, तळवडे रोड, पुणे
६. **सुश्मिता बंडु हितेज** – सुभाषवाडी, निघोजे (ता. खेड, जि. पुणे)
### **या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:**
सदरची धडक कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त डॉ. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली आणि पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ४) श्रीमती श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत महाळुंगे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक दिवसे व त्यांचे पथक, तसेच एम.आय.डी.सी. विभागाचे अधिकारी श्री. कर्डीले व त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष सहभाग घेतला.
पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.
न्यूज एक्सप्रेस १८ विशेष वृत्त.**
*वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत! ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एक्सप्रेस १८.*
