प्रतिनिधी परमेश्वर कांबळे
चिंचवड, पुणे : मोहन नगर परिसरातील गाय वासरू चौक येथील हॉटेल पुणे दरबार चालका रहीम शेख विरोधात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देत आरोपीविरुद्ध अधिक कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच मोहन नगर परिसरातील भाड्याने देण्यात आलेल्या दुकान आणि घरांच्या कायदेशीर करारनाम्यांची तपासणी करण्याचीही आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.
याशिवाय, या भागात वाढत्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाड्याने देण्यात येणाऱ्या मालमत्तांबाबत संबंधित एजंट आणि मालकांनी संपूर्ण व अचूक माहिती पोलिस स्टेशनमध्ये नोंदवणे बंधनकारक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व उपक्रमांसाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
