Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे मालमत्ता कर संकलनात वाढ – महापौर रवि लांडगे*
पिंपरी चिंचवड

नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे मालमत्ता कर संकलनात वाढ – महापौर रवि लांडगे*

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comApril 6, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान*

*पिंपरी, दि. ६ एप्रिल २०२६:* नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे,या यशामागे करसंकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अविरत श्रमदान आणि जबाबदारीने केलेले काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये मालमत्ता कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ तसेच आगामी आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी मालमत्ता कर बिल वाटप मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला बचत गटांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते.

उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या सुलभा उबाळे,निकिता कदम, सारिका मासुळकर, नीता पाडळे यांच्यासह महापालिका उपायुक्त सचिन पवार,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह करसंकलन विभागातील अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटाच्या महिला सदस्या आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर,आयुक्त तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी ‘अभय योजना’ प्रभावी आणि यशस्वीपणे राबविल्याबद्दल करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांचे विशेष कौतुक केले.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “शहराच्या प्रगतीत महिलांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असून मागील वर्षी महिलांमार्फत केलेल्या नियोजनबद्ध बिल वाटपामुळे यंदा मालमत्ता कर वसुलीत सकारात्मक वाढ झाली आहे. नागरिकांना कर वाढ होईल अशी अपेक्षा होती, मात्र महापालिकेने ‘अभय योजना’ राबवून मोठ्या प्रमाणात दिलासा दिला. बचत गटातील महिलांना केवळ ४० दिवसांपुरता रोजगार न देता त्यांना वर्षभर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. यंदा ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरला, ही बाब प्रशासनावरील विश्वास आणि डिजिटल प्रणालीचा स्वीकार दर्शवणारी आहे. अभय योजनेलाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ७० हजार मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. थकबाकी कमी करण्यासाठी नागरिकांनी दिलेला हा प्रतिसाद शहराच्या जबाबदार नागरिकत्वाचे प्रतीक आहे, असे देखील महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

उपमहापौर शर्मिला बाबर यावेळी बोलताना म्हणाल्या, “महानगरपालिकेने महसूल वाढीबरोबरच महिलांना स्वावलंबी बनवण्यावरही ठोस भर दिला आहे. सीएचडीसी प्रकल्पांतर्गत ‘सिद्धी’ अ‍ॅपच्या माध्यमातून कर प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे केवळ प्रशासन अधिक कार्यक्षम झाले नाही, तर महिलांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत ६०० हून अधिक महिलांना घरपोच बिल वाटपाच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. या संधीमुळे अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले, त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि समाजात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास मदत झाली. आज या महिला केवळ कर्मचारी नसून शहराच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाच्या भागीदार म्हणून काम करत आहेत.”

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, “जशी प्रत्येक महिला कुटुंबाचा आधार असते, त्याचप्रमाणे बिल वाटप करणाऱ्या महिला महापालिकेच्या महसूल वाढीचा मजबूत पाया ठरत आहेत. यंदाची ९६१ कोटींची रक्कम ही केवळ वसुली नसून महापालिकेची कमाई आहे. महिलांमार्फत केलेले बिल वाटप आणि ‘अभय योजने’ची प्रभावी अंमलबजावणी यामुळेच विक्रमी कर संकलन शक्य झाले. महिलांनी बिल वाटप करताना केवळ बिल देण्यापुरते न राहता मालमत्ता करातील सवलतींची माहितीही नागरिकांना द्यावी, जेणेकरून नागरिकांनी पहिल्याच तिमाहीत कर भरून थकबाकीदारांच्या यादीत जाणे टाळावे.”

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, विक्रमी कर वसुलीसाठी १८ विभागीय कार्यालयांमध्ये ‘परफॉर्मर ऑफ द डे’सारख्या स्पर्धा राबविण्यात आल्या होत्या. या उपक्रमामुळे सर्व विभागीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि स्पर्धात्मक पद्धतीने काम केले, ज्याचा सकारात्मक परिणाम करसंकलनावर दिसून आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे जी बचत गटांच्या माध्यमातून मालमत्ता कर बिल वाटप करत आहे. बचत गट ही देशातील एक मोठी सामाजिक-आर्थिक चळवळ असून या गटातील महिलांनी कर आकारणी व संकलनाबरोबरच महापालिकेच्या इतर विभागांतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शहरातील बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी ‘अर्बन सरस महोत्सवा’सारखे उपक्रमही सुरू करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सचिन पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
……
*१८ विभागीय कार्यालयांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव*

कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांसह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या अंतर्गत निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी-वाघेरे, पिंपरी नगर, मनपा भवन, फुगेवाडी-दापोडी, भोसरी, चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे, दिघी-बोपखेल, वाकड व कस्पटेवस्ती या विभागीय कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच करसंकलन विभागातील प्रशासन अधिकारी सुचेता कुलकर्णी, रश्मी देशपांडे, संजय तळपाडे, जयवंत निरगुडे तसेच जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय मे. फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीज प्रा. लि., मे. टेक नाईन प्रा. लि. आणि मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. यांच्या कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

*‘सिद्धी’ अ‍ॅपचे प्रशिक्षण; ६०० हून अधिक महिलांचा सहभाग*

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सक्षम’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गट फेडरेशनच्या ६०० हून अधिक महिलांना मालमत्ता कर बिल वाटप प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ‘सिद्धी’ अ‍ॅपच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना घरपोच बिल कशाप्रकारे वाटप करायचे, याची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नवी मालमत्ता सर्वेक्षण प्रक्रिया आणि ‘गो ग्रीन’ उपक्रमांतर्गत ई-बिल वाटपाबाबतही महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. सीएचडीसी प्रकल्पातील कर्मचारी रोहिणी कदम यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह महिलांना प्रशिक्षण दिले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन*
Next Article नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर – महापौर रवि लांडगे*
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ## 🛑 सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी शैला कोरडे रुजू!

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

By newsexpress18pune@gmail.comJune 1, 20260

**’ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत ११० मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले** **राहुरी /…

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.