सातारा जिल्ह्यातील :- माण तालुक्यातील आंधळी येथे रविवारी झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तन कार्यक्रमात एका पत्रकाराला व्हिडिओ चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी माण तालुक्यातील पत्रकारांनी सोमवारी (दि.९) दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत इंदुरीकर महाराज आणि संबंधित व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
आंधळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रांचे सहसचिव लिंगराज साखरे हे गेले असता. यावेळी कीर्तन सुरू असताना इंदुरीकर महाराज यांनी आपल्या जवळील एका व्यक्तीला खुणावून साखरे यांना व्हिडिओ चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर संबंधित व्यक्ती साखरे यांच्या जवळ येवुन त्यांचा कॅमेरा ढकलून देत व्हिडिओ करू नये असा दम दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकारानंतर लिंगराज साखरे हे तेथून निघून गेले.
दरम्यान हा प्रकार मान तालुक्यांतील प्रिंट व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना समजताच सोमवारी सकाळी पत्रकारांनी दहिवडी पोलीस ठाणे गाठून लिंगराज साखरे यांच्या नावे इंदुरीकर महाराज व संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच या घटनेचा पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
शासकीय कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार लाईव्ह चित्रीकरण करत असताना त्यांनाच दमदाटी व धक्काबुक्की होणे अत्यंत निंदनीय असल्याचे मत पत्रकारांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून वगळावे आणि त्यांच्या ऐवजी अन्य योग्य व्यक्तीची नेमणूक करावी आणि अभियानाचे प्रबोधन करण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणीही पत्रकारांनी चांगलीच केली आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार दीपकराव तंडे-बडवे, लालासाहेब दडस, लिंगराज साखरे, सचिन मंगरूळे, धनंजय कावडे, राजेश इनामदार, बापूसाहेब मिसाळ, सचिन शिंगाडे, संदीप जठार, फिरोज तांबोळी, नितीन वाघमोडे, उमेश बुधावले, प्रवीण राजे, एकनाथ वाघमोडे, नवनाथ भिसे, चैतन्य काशीद, सोनाली माने, ओंकार माने आदीं बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते.
या प्रकरणी कारवाई करण्यासाठी पत्रकारांनी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
