Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»लोकशाही सक्षमीकरणासाठी प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याचा नववर्षात संकल्प करा – आयुक्त श्रावण हर्डीकर….*
पिंपरी चिंचवड

लोकशाही सक्षमीकरणासाठी प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याचा नववर्षात संकल्प करा – आयुक्त श्रावण हर्डीकर….*

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comDecember 31, 2025No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महिला बचत गटातील शेकडो महिलांचा १००% मतदानाचा निर्धार,मतदान करण्याचीही घेतली शपथ…

 

पिंपरी, दि. ३१ डिसेंबर २०२५ :* भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला मतदानाचा हक्क केवळ अधिकार नसून तो प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदान केल्याने लोकशाही अधिक सक्षम होते. २०२६ हे नववर्ष आता सुरू होत आहे. या नववर्षात प्रत्येक निवडणुकीत नियमितपणे मतदान करण्याचा ठाम संकल्प करून याची सुरुवात येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतून करा, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले. नागरिकांचा सक्रिय सहभागच सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी लोकशाही घडवू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती उपक्रम शहरातील विविध भागांत राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत आज महापालिकेच्या समाज विकास विभागाने आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात उभारलेल्या ‘सखी आंगण’ येथे मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला,त्यावेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते.

https://newsexpress18.online/wp-content/uploads/2025/12/VID-20251231-WA0665.mp4

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, उपायुक्त ममता शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महिला बचत गटांतील महिला यावेळी उपस्थित होत्या.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, नवीन वर्षाचे आगमन आपल्या आयुष्यात नव्या आशा, संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सखी आंगण’सारखा उपक्रम तुमच्या आयुष्याला निश्चितच कलाटणी देणारा ठरेल, असा मला ठाम विश्वास आहे. ही वास्तू केवळ एक प्रकल्प नसून तुमच्या सर्वांच्या आयुष्यात स्थैर्य, स्वावलंबन आणि भरभराट घडवून आणण्याचे माध्यम ठरेल. येत्या काळात येथे मिळणाऱ्या संधींचा पुरेपूर लाभ घेऊन प्रत्येकाने स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा विकास साधावा. तसेच नवीन वर्षातच, १५ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्व पात्र मतदारांनी आवर्जून मतदान करून लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या कुटुंबातील प्रत्येक मतदाराला,मित्रपरिवाराला देखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे. कोणाच्याही दबावाखाली न येता, स्वेच्छेने आणि निर्भयपणे मतदान करणे हीच सक्षम आणि बळकट लोकशाहीची खरी ओळख आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मतदान जनजागृतीबाबत पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. माणिक खटींग, निलम वाघमारे, अनिकेत शिंदे, शिवप्रसाद पासलकर, भरत साळुंखे या कलाकारांनी या नाटकाचे सादरीकरण केले. तसेच फ्लॅश मॉबचे सादरीकरण करून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


आयुक्तांनी महिला बचत गटांकडून तयार केलेल्या खाद्यपदार्थांची केली खरेदी*

  • आकुर्डी येथील सखी आंगण खाद्यपदार्थ केंद्रात एकूण ४९ गाळे कार्यरत असून, या ठिकाणी महिला बचत गटांमार्फत विविध खाद्यपदार्थांचा व्यवसाय केला जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या सर्व गाळ्यांना भेट देत महिला बचत गटांकडून सुरू असलेल्या व्यवसायाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी विविध खाद्यपदार्थांची खरेदी करून त्यांचा आस्वाद घेत महिलांच्या उपक्रमांचे कौतुक देखील केले.

*मतदानाची शपथ*

आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी मतदानाची शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.
…..

मतदान ही केवळ निवडणुकीतील एक प्रक्रिया नसून ती नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी लोकशाही मूल्यांची अभिव्यक्ती आहे. महिलांनी आणि युवकांनी पुढाकार घेऊन मतदान केल्यास समाजातील सकारात्मक बदल अधिक वेगाने घडू शकतात. प्रत्येक मत हे लोकशाहीचा पाया मजबूत करणारे असते. म्हणूनच मतदानाबाबत जागरूकता निर्माण करून प्रत्येक पात्र नागरिकाला मतदान प्रक्रियेत सहभागी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

– तृप्ती सांडभोर,
अतिरिक्त आयुक्त,
पिंपरी चिंचवड महापालिका

स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी महापालिका सातत्याने शहराच्या विविध भागात उपक्रम राबवत आहे. प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रापर्यंत पोहोचावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात असून जास्तीत जास्त नागरिकांनी येत्या १५ जानेवारीला मतदान करावे.
– अण्णा बोदडे,
उपायुक्त,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

सखी आंगणसारखे उपक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्वाचे माध्यम ठरतात. आर्थिक स्वावलंबनासोबत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला, तर समाज अधिक सक्षम आणि समतोल बनेल. त्यामुळे सखी आंगण येथे घेतलेला मतदान जनजागृती उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे.

-ममता शिंदे,
उपायुक्त,
पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभाजपमध्ये तिकीट वाटपावरून असंतोषाचा भडका; ‘आयात’ उमेदवारांना प्राधान्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप*
Next Article धर्मराज नगर येथे भाजपाचे अधिकृत उमेदवार यांची पदयात्रा संपन्न*
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ## 🛑 सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी शैला कोरडे रुजू!

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

By newsexpress18pune@gmail.comJune 1, 20260

**’ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत ११० मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले** **राहुरी /…

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.