Site Logo
पुणेमहाराष्ट्र

पुण्यात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न**

प्रतिनिधी पुणे

पुणे :- येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांमध्ये सौ. सुनिता ताई काळे, सौ. सुजाता किरण माने, सौ. अलकाताई आणि नगरसेविका सौ. तेजश्री ताई सचिन बदक यांची उपस्थिती लाभली.

सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माता-भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच वीर माता व वीरपत्नींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सौ. अलकाताई, सौ. सुजाता ताई आणि सौ. सुनिता ताई यांनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरणावर भर देत, जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक तालुका व जिल्ह्यात अशा सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्याचे आवाहन केले. भविष्यातही हा उपक्रम सातत्याने राबवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन खंडागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल बोराडे, ग्रामीण विभाग अध्यक्ष योगेश भोसले, शहर उपाध्यक्ष राहुल सकट, कार्याध्यक्ष नेताजी पवार, संघटक महेश शर्मा, मुनाफ पटेल, साजिद शेख, सागर घाईतडक, अविनाश क्षीरसागर, नामदेव केदारी, धनंजय साळवी तसेच पिंपरी चिंचवड अध्यक्षा पुष्पाताई थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता ताई दिसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयश्री ताई पाटील यांनी केले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button