Site Logo
गुन्हेगारीमहाराष्ट्र

गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलीसांचा छापा; मोठा मुद्देमाल जप्त**

प्रतिनिधी | बीटरगाव

बीटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत देशी-विदेशी तसेच गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत एकूण 4 गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत सुमारे 59,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मेट व ढाणकी शेत शिवार, बीटरगाव येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे चार ठिकाणी पंचांसमक्ष छापे टाकण्यात आले.

या छाप्यात एकूण 1200 लिटर मोहामाचा सडवा (किंमत अंदाजे 48,000 रुपये) तसेच 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (किंमत 3,000 रुपये) असा एकूण 51,000 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. याशिवाय 8,060 रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली.

हातभट्टी दारूच्या नमुन्यासाठी काही माल राखून ठेवून उर्वरित सडवा जागेवरच पंचनामा करून नष्ट करण्यात आला. देशी-विदेशी दारू मात्र जप्त करून ताब्यात घेण्यात आली आहे.

या प्रकरणी खालील आरोपींविरुद्ध बीटरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

1. गजानन शामराव जाधव (वय 42, रा. मेट, ता. उमरखेड)
2. रमेश थावरा चव्हाण (वय 34, रा. मेट, ता. उमरखेड)
3. देविदास चंदू कवडे (रा. बीटरगाव, ता. उमरखेड)
4. संतोष नारायण देवकते (वय 35, रा. बीटरगाव, ता. उमरखेड)

ही कारवाई कुमार चिंता, अशोक थोरात, गायकवाड आणि सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button