अवैध देशी व विदेशी दारुच्या एकूण 37 पेटया एकूण किंमत 1,46,170/- रु मुददेमाल दोन इसमा विरुध्द येथे गुन्हा दाखल
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

पुसद तालुका प्रतिनिधी
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची, अवैध देशी व विदेशी दारु तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 07/03/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे उमरखेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना सकाळी 08/00 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, मौजे ब्राम्हणगांव येथे अवैध विना परवाना देशी व विदेशी दारुची मोठ्या प्रमाणे विक्री होत आहे अशी माहीती मिळाल्याने ब्राम्हणांव येथील अवैध देशी व विदेशी दारु विक्री करणा-या इसमांची माहीती काढून ब्राम्हणगांव येथे पंचा समक्ष सापळा कारवाई केली असता 1) इसम नामे विजय ऊर्फ पप्पू मारोती कर्नवाड वय 33 वर्ष, रा. ब्राम्हणगांव ता. उमरखेड जि. यवतमाळ यांच्या घरी देशी दारु भिंगरी 180 MI क्षमतेच्या एकूण 32 पेटया, प्रत्येक पेटीत 48 नग प्रमाणे एकूण 1536 नग शिश्या, तसेच देशी दारु भिंगरी 90 MI क्षमतेच्या एकूण 05 पेटया, प्रत्येक पेटीत 100 नग प्रमाणे एकूण 500 नग शिश्या, तसेच 2) इसम नामे-नितीन प्रकाश पलंचेवार यांच्या ताब्यातून देशी दारु भिंगरी 180 MI क्षमतेच्या 20 नग शिश्या तसेच विदेशी 07 नग अशा एकूण 2056 नग देशी व 07 विदेशी दारुच्या शिश्या किंमत 1,46,170/-रु (एक लाख छेचाळीस हजार एकसे सत्तर रुपये) मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून 1) इसम नामे विजय ऊर्फ पप्पू मारोती कर्नेवाड वय 33 वर्ष, रा.ब्राम्हणगांव ता. उमरखेड जि. यवतमाळ 2) नितीन प्रकाश पलंचेवार वय 50 वर्ष, रा. ब्राम्हणगांव ता.उमरखेड जि. यवतमाळ विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई अन्वये पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती.
सदरची कामे मा पोलिस अधिकारी यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा अतिरिक्त पोलीस अधिकारी अशोक थोरात (म.पो.से) सा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड सा.मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे सफी/मुन्ना आडे, पोहबा/संतोष भोरगे, पोहवा/तेब रणखांब, पोहवा सु जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहडा, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली



